Monday, December 13, 2010

another year

another year breezes away and am still clueless about what I want to do next. Need to take some more time off to move away from the chaos and listen to myself.

Monday, October 25, 2010

फुलपाखरे

एक्स्प्रेस वे वरून जाताना खूप सारी फुलपाखर पाहिली. इवलीशी पिवळी. काही बागडणारी. काही भरधाव जाणाऱ्या गाड्यांना आदळून मारून पडलेली. काही जिवंत पण तडफड करणारी. काहीच करू न शकल्यामुळे मन सुन्न झालं. खरच किती सुंदर आहे निसर्ग आणि किती क्रूर आहे मनुष्य!!

Monday, September 27, 2010

आईपण


कधी कधी रात्री झोपेतून हलकेच जाग येते. तेव्हा मला चिकटून झोपलेल्या माझ्या बाळाला कुशीत घेऊन परत झोपते. कधी कधी त्याला माझ्या कुशीत येण्यापेक्षा मला त्याला कुशीत घेण्याची ओढ असते.

पाउस

धो धो पडणारा पाउस. दुपारभर उकडलेल्या शेंगा खात tv बघितला. संध्याकाळी खाली गेलो तर बुचाच्या फुलांचा सडा पडलेला. हावरट पणाने फुलं वेचताना बघून नवरा हसला. लहान आहेस अजून. असू देत. तुला नाही कळणार. ती फुलं वेचताना वेचल्या आहेत काही आठवणी, लहानपणचे काही क्षण. मोठ्यांच्या या जगात पुरतील थोडे दिवस मला.